विजय - वर्गातल्या मोजक्याच हुशार मुलांमधला, मध्यम उंचीचा, गोरा, आणि मितभाषी मुलगा. कुठल्याही स्कॉलर मुला मध्ये असणारे सगळे गुण ह्याच्या मध्ये.
यथावकाश कॅम्पस सिलेक्शन होऊन एका मोठ्या मल्टि -नॅशनल कंपनी मध्ये लागला. आता हॉस्टेल ची अडजस्टमेन्ट संपली,आणि मित्रांबरोबर रूम वर राहायची श्रीमंती आली, मोबाईल आला, दुचाकी आली, वीकेंड ला मल्टि-प्लेक्स मध्ये मूव्ही आली, डोगर-गड वरची भटकंती आली. एकूण काय तर "मज्जा - नी - लाईफ" आली.
पण शेवटी स्कॉलर तो स्कॉलर; त्यामुळे विजय ने पुढे शिकण्यासाठी आणि करणाऱ्या कामात अजून खोल जाण्यासाठी काही ग्रुप्स आणि ऑन -लाईन फोरम्स चे सदस्त्यव घेतले. त्यातून त्याला जास्तीत जास्त शिकवायला पण मिळाले. त्याच बरोबर त्याने पण त्याचे विचार मांडणे आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरु केले. त्यामुळे काही लोकांशी त्याचे ई-मेल वर बोलणे पण सुरु झाले. प्रोजेक्ट्स ची देवाण घेवाण वाढली.
त्यातच एक "ईला" होती, कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला आणि हुशार. दोघांची कधी ओळख संपून मैत्री झाली ते त्यांना पण समजले नाही. दोघेही एकाच शहरात राहत होते पण मैत्री मात्र ऑन - लाईन होती. दोघांनाही कधी वाटे कि एकमेकांना भेटायला हवे पण "भेट" हे बोलायलाच दोघांना वेळ लागला.
नंतर जेव्हा केव्हा ते भेटण्याचा प्लॅन बनवत, पण कुठे तरी माशी शिंकत.
कधी त्याला ऑफिस मध्ये जास्त वेळ बसून राहावे लागे तर कधी तिला सुट्ट्या म्हणून ती गावी जात. कधी त्याचा मित्रांबरोबर प्लॅन ठरलेला असे तर कधी तिची इंडस्ट्रियल व्हिझिट असे. कधी त्याच्या कडे गावाहून आई वडील आलेले असे तर तिचा व्हाय-वा असे. कधी तिची पी -एल असे तर तो कधी महिन्यांसाठी कंपनी च्या काम साठी परदेशी.
जवळ-जवळ वर्ष झालेले पण त्यांच्या भेटीला सारखा काही ना काही अडथळा येतच होता.
शेवटी दोघांनीही भेटण्याचा हट्ट सोडला. असेल नशिबात तर भेटू असे ठरवूनच टाकलेले. कारण प्लॅन करून परत न भेटण्याची सल जास्त लागे.
आता त्यालाही ६ महिने होऊन गेलेले.
आज रविवार होता... होता खरा पण त्याला वेळ न्हवता इतर बरीच कामे असल्याने त्याने मित्रांबरोबर आज भटकंती ला जाणे टाळले. आज त्याला राहत्या घराचा भाडे करार नूतनीकरण, नवीन स्वयंपाकी, नवीन देशाला जाण्यासाठी त्याचे विझा अँप्लिकेशन, टॅक्स रिटर्न्स असे बरीच कामे करायची होती.
एकंदरच बाकी च्या दिवशी असणाऱ्या कामाच्या बोझ्या मुळे हि कामे करावी लागणार, मित्र बरोबर फिरायला जाता येणार नाही म्हणून स्वारी आधीच जरा नाखूष होती त्यातच घरातून निघणार तोच हेल्मेट ची काच तडकली. टोपी घातली आणि निघाली स्वारी. थोडे अंतर जात नाही तर वाऱ्या मुळे टोपी उडाली... परत मागे येऊन टोपी घेतली - एकंदर काय तर अजून उशीरच झाला... आजचा दिवस असा कसा म्हणून वैतागून च निघाला परत - सांगणार तरी कुणाला.
भांडारकर रोड वरची काही कामे केली आणि विझा साठी लागणारे फोटो काढले, कोपऱ्याच्या दुकानातून टॅक्स रिटर्न्स ची झेरॉक्स काढली आणि निघाला परत; पण गाडी कडे येतो ना येतो तोच लक्षात आले कि ओरिजिनल टॅक्स रिटर्न्स ची कॉपी झेरॉक्स दुकानातच राहिली... झाले चिडलाच स्वतःवर
आजचा दिवसच वाईट म्हणून जरा शिव्या हासडतच दुकानाकडे पळाला. धड-धड,चीड-चीड करत कि ओरिजिनल पेपर्स सापडतील कि नाही. धापा टाकताच दुकानात गेला त्याची कानशिलं तापली होती, आज हेल्मेट नाही म्हणून रस्त्याची सगळी धूळ चेहऱ्यावर होती, त्यात घामाने ती धूळ चिकटवायचे काम उत्तम केले होते.
घाईघाईतच त्याने नुकत्याच आलेल्या ग्राहकाकडे ढुंकून नही बघता, त्याची तमा ना बाळगता, जरा चिडक्या वैतागलेल्या आणि घाबऱ्या आवाजात कागदपत्रांची विचारणा केली.
आणि तेवढ्यात पुढची व्यक्ती एक्दम मागे वळली. "ईला"
"ईला" च ती; तो स्तब्धच झाला. हसणे, चिडणे, धडधडणे, बोलणे सगळे सगळेच तो विसरला. त्याला काय होतेय ते त्यालाच समजेना. हसू? कि बोलू? काय करू? कसा दिसतोय? हि इथे कशी? विचारू? काय करू? त्याचा पुतळाच झाला.
तिला भेटून आता ४ तास होऊन गेले. तो एकटाच आणि एकंदरच विचारात गुंग झाला होता. सगळंच दिवस कसा गेला हेल्मेटचा, टोपीचा, ATM च्या रांगेचा अढथळा आला नसता तर...
आजपर्यंत त्यांच्या भेटीला जे अडथळे आले ते आणि आज त्याच अडथळ्यामुळे ते भेटले. २ मिनिटे सुद्धा तिला ऊशीर झाला असता, किव्हा २ मिनिटे सुद्धा तो लवकर गेला असता किव्हा ओरिजिनिअल पेपर विसरलाच नसता तर... जे घडले ते त्याच क्रमाने, तेवढ्या वेळेसाठीच घडले नसते तर...